रौप्य महोत्सवी वर्ष २०१६-१७


अभिनव मानव विकास संस्थाद्वारा संचालित श्रीकिशन सोमाणी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय गत २५ वर्षांपासून शिक्षण प्रसाराचे कार्य करीत आहे. व्यक्तीजीवनात २५ वर्षांचा कालखंड हा अधिक वाटत असला तरी संस्था जीवनात हाच कालखंड अतिशय अल्प मानला जातो. सन २०१६-१७ हे श्रीकिशन सोमाणी विद्यालयाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून संस्थेने विशेष उल्लेखनीय ठरावेत असे कार्यक्रम वर्षभर राबविण्याचे धोरण नियोजनपूर्वक कार्यान्वित केले आहे. संस्थेच्या नियोजित धोरणानुसार विद्यालयात वर्षभर वैविध्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम राबविले जाणार आहेत. रौप्यमहोत्सवी वर्षात घेण्यात आलेल्या कार्यक्रमांचा संक्षिप्त अहवाल येणेप्रमाणे आहे: