अभिनव आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा


रौप्यमहोत्सवाच्या औचित्याने विद्यालयात ६ जानेवारी २०१७ रोजी अभिनव आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या वक्तृत्व स्पर्धेत श्रीकिशन सोमाणी विद्यालायासह शहरातील १० विद्यालयातील एकूण ४० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रस्तुत वक्तृत्व स्पर्धा घोषित केल्याप्रमाणे अभिनव अशा स्वरूपाची होती. या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांना पूर्वतयारी करता यावी म्हणून स्पर्धा परिपत्रकाद्वारे खालील विषय अभ्यासार्थ देण्यात आले होते.
१. लातूर शहर हरित कसे करता येईल?
२. वाचाल तर वाचाल
३. भ्रमणध्वनीची व्यसनाधीनता
स्पर्धेत आपल्या वक्तृत्व कलेचे दर्शन घडवू इच्छिणाऱ्या स्पर्धकाला मंचावर ठेवण्यात आलेल्या विषयांच्या चीठ्ठ्यांमधून एक चिठ्ठी उचलून त्यावर नोंदविलेल्या विषयावर वक्तृत्व सादर करणे अपेक्षित होते. प्रस्तुत स्पर्धेच्या संदर्भात विद्यालयाने निर्धारित केलेल्या विवक्षित नियामांबरहुकुम स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली. या अभिनव आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन अ.मा.वि. संस्थेचे सदस्य व लातुरातील ख्यातकीर्त उद्योजक डॉ. हरिप्रसाद सोमाणी यांच्या हस्ते झाले. स्पर्धेचे उद्घाटक डॉ. हरिप्रसाद सोमाणी यांनी स्पर्धकांना स्पर्धेत यशस्वी होण्याची सूत्रे आपल्या रंजनपर शैलीतून उलगडून दाखविली. अभिनव आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेच्या स्वरूपाविषयी उपमुख्याध्यापक राजेंद्र लातूरकर यांनी प्रस्ताविकामधून सविस्तर विवेचन केले. या स्पर्धेच्या उद्घाटनसमयी मंचावर अ.मा.वि. संस्थेचे अध्यक्ष डॉ. चेतन सारडा, सचिव कमलकिशोर अग्रवाल, सहसचिव सुभाष कासले, कोषाध्यक्ष जयेश बजाज, प्रशाला प्रमुख सुभाष मिश्रा, उपमुख्याध्यापक राजेंद्र लातूरकर हे उपस्थित होते. या वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. डॉ. विजयकुमार करजकर व प्रा. डॉ. भीमराव पाटील हे उपस्थित होते. सदर वक्तृत्व स्पर्धा दिवसाच्या दोन सत्रात घेण्यात आली. यावेळी श्रीकिशन सोमाणी विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक, स्पर्धेत सहभागी विद्यार्थी त्यांचे मार्गदर्शक शिक्षक व पालक यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. स्पर्धा समाप्त होताच प्रा. डॉ. विजयकुमार करजकर यांनी स्पर्धेच्या अनुषंगाने व स्पर्धेच्या नियोजनाच्या संदर्भात विशेष उल्लेखनीय मत प्रदर्शित करून स्पर्धेचा निकाल घोषित केला. या स्पर्धेत विजयी ठरलेले स्पर्धक खालीलप्रमाणे आहेत:

अ.क्र.विद्यार्थ्याचे नावविद्यालयाचे नावस्पर्धेतील गुणानुक्रमपारितोषिकाचे स्वरूप
चि. गणेश सतीश शिंदेश्रीकिशन सोमाणी विद्यालयप्रथम३१०० रु., सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
कु. श्रुती दत्तात्रय स्वामीश्री केशवराज विद्यालयद्वितीय२१०० रु., सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
कु. संध्या संतोष उटगेश्रीकिशन सोमाणी विद्यालयतृतीय११०० रु., सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
कु. राखी परमेश्वर बिराजदारश्री देशिकेंद्र विद्यालयउत्तेजनार्थसन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
चि. श्रेयस तुकाराम वडवळे श्री केशवराज विद्यालयउत्तेजनार्थसन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
कु. प्रेरणा नानासाहेब नांदेश्रीमती गोदावारीदेवी लाहोटी विद्यालयउत्तेजनार्थसन्मानचिन्ह व प्रमाणपत्र