ABACUS AND VEDIC MATHS


विद्यालयात अॅबॅकस व वैदिक गणित हे विषय तज्ज्ञ शिक्षकांद्वारे शिकवले जातात. अॅबॅकस व वैदिक गणित हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रगत व रचनात्मक पद्धतीने Googolplex Academy हैदराबादने ठरवलेले शैक्षणिक अभ्यासक्रम आहेत. अॅबॅकसची संकल्पना शरीर व मनाच्या पद्धतीवर आधारित आहे. वैदिक गणित ही एक अशी कला आहे, की ज्यामुळे कोणत्याही इलेक्ट्रॉनिक साधनांचा उपयोग न करता लवकर व अचूक आकडेमोड करता येते. अॅबॅकस हे जगातील सर्वात जुने आकडेमोडीसाठी वापरले जाणारे साधन आहे. अॅबॅकसचा दीर्घकाळ वापर केल्याने मेंदूची कार्यक्षमता व स्मरणशक्तीच्या वाढीस मदत होते, हे संशोधनाने सिद्ध झाले आहे. अॅबॅकस स्केल ही पूर्वी लाकडाची बनवलेली असे ज्यावर सरकणाऱ्या मणी असत आणि आज ती प्लास्टिकची असून त्यावर रंगीबेरंगी सरकणाऱ्या मणी आहेत ज्याचा वापर मोजणी व गणिती क्रिया करण्यासाठी केला जातो.

अॅबॅकस स्केल हे वेगाने व अचूक पद्धतीने गणिती क्रिया करण्यासाठी वापरले जाणारे लोकप्रिय साधन आहे. गणिती क्रिया करताना अॅबॅकस स्केलमधील मणी फिरवण्यासाठी दोन्ही हातांचा वापर करावा लागतो आणि आपणास माहीत आहे, की उजवा मेंदू हा शरीरातील डाव्या अवयवांवर नियंत्रण ठेवतो व डावा मेंदू उजव्या अवयवांवर नियंत्रण ठेवतो. म्हणून अॅबॅकसचा वापर केल्याने मंदूची कार्यक्षमता वाढते.

उजवा मेंदू – डावा मेंदू

मेंदूच्या वर्चस्व सिद्धांतानुसार मानवाचा उजवा मेंदू हा अर्थपूर्ण व सर्जनशील कामे करण्यास उत्कृष्ट आहे आणि डावा मेंदू हा तर्कशास्त्र, भाषा आणि विश्लेषणात्मक विचार करण्यास उत्कृष्ट आहे. अॅबॅकसमुळे उजवा आणि डावा या दोन्ही मेंदूंचा वापर होतो. म्हणून अॅबॅकस हे मुलांसाठी एक मेंदूचा मूलभूत विकास करणारे उपक्रम म्हणून सिद्ध झाले आहे. ते मुलांमध्ये मजबूत गणिती कल पाया घालते आणि त्यांची सर्व भागात एकाग्रता सुधारते.

वैदिक गणित

वैदिक गणित हे प्राचीन काळातील गणिती प्रणालीस दिलेले नाव आहे. ज्याचा शोध श्री भारती कृष्णा तीर्थ यांनी १९११ ते १९१८ दरम्यान प्राचीन काळातील वेदांपासून लावला. त्यांच्या संशोधनानुसार गणित हे १६ सूत्रांवर आधारित आहे. वैदिक गणिताद्वारे प्रदान केलेली गणनानीती ही सर्जनशील आणि उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. विशेषतः अंकगणित व बीजगणितामध्ये याचा उपयोग होतो. वैदिक गणिताचा वापर करून गणिते अगदी मानसिकरीत्या सोडवले जाऊ शकतात व त्याहूनही अधिक विद्यार्थी सर्जनशील बनून ते गणित सोडवण्याच्या स्वतःच्या नावीन्यपूर्ण पद्धती निर्माण करू शकतात.