TATA CLASSEDGEविद्यालयात प्रत्येक वर्गामध्ये डिजिटल ई-लर्निंग क्लासरूमची सुविधा उपलब्ध असून, या दृकश्राव्य साधनांच्या मदतीने शाळेतील इयत्ता बालवाडी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अध्यापन केलेल्या पाठ्यक्रमाचे मार्गदर्शन ई-लर्निंग सॅाफ्टवेअरद्वारे केले जाते. दृकश्राव्य स्वरूपात मार्गदर्शन केल्यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासातील रुची वाढते व अध्ययन क्षमता दृढ होण्यास मदत होते. विद्यालयाने ई-लर्निंग सुविधेसाठी "TATA CLASS EDGE" सोबत करार केला आहे.
TATA CLASSEDGE हे एक उत्कृष्ट ई-लर्निंग सॉफ्टवेअर साधन आहे. हे सॉफ्टवेअरद्वारे शिक्षक विद्यार्थ्यांना ई-लर्निंग माध्यमाद्वारे चांगल्या पद्धतीने शिकवतात. TATA CLASSEDGE हे सॉफ्टवेअर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने ठरवलेल्या अभ्यासक्रमानुसार मराठी व सेमी इंग्रजी माध्यमातून उपलब्ध आहे.

सॉफ्टवेअरची ठळक वैशिष्ट्ये :

 1. शिक्षकांना पाठाचे नियोजन व टिप्पणी वाचता येते.
 2. शिक्षकांना आवश्यक त्या पद्धतीने गृहपाठाचे नियोजन करता येते.
 3. शिक्षक पाठाबद्दल स्वतःची अधिक माहिती या सॉफ्टवेअरमध्ये जतन करून व त्याची एकमेकांना देवाणघेवाण करू शकतात.
 4. विद्यार्थ्यांसमोर प्रत्यक्ष स्वरूपाचे आभासी वातावरण निर्माण करून वैज्ञानिक, नैसर्गिक, ऐतिहासिक व भौगोलिक संकल्पना स्पष्ट करता येते.
 5. विद्यार्थ्यांना सतत शैक्षणिक उपक्रमात गुंतवून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होते.
 6. विद्यार्थ्यांची विचारसरणी व कौशल्य वाढीस मदत होते.
 7. प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक विभागासाठी पाठ समजण्यासाठी व्यंग्यचित्रित पात्रांचा वापर केला आहे.

प्रत्येक पाठातील वैशिष्ट्ये:-

 1. प्रत्येक पाठाची मुद्देसूद मांडणी करण्यात आली आहे.
 2. पाठावर आधारित उपक्रमांची यादी उपलब्ध आहे.
 3. संकल्पना स्पष्ट करण्यासाठी मुद्द्यावर आधारित चलचित्रे आहेत.
 4. विषयाला अनुसरून संक्षिप्त टिपा आहेत.
 5. सरावासाठी पाठावर आधारित वर्कशीट व प्रश्नोत्तरे आहेत.
 6. मजेदार पद्धतीने सराव करण्यासाठी खेळाद्वारे (GAME EDGE) प्रश्नोत्तरे सोडविले जातात.
 7. गणित व विज्ञान या विषयांसाठी आभासी प्रात्यक्षिक टूल (LAB EDGE) उपलब्ध आहे.