18 October 2022 - कथाकथी स्पर्धेत चि. संकेत शेरीकर विजयी

दि- 18/10/2022 - मुंबईतील मुक्तछंद युट्यूब चॅनलने आयोजित केलेल्या राज्य स्तरीय ऑनलाईन कथाकथी स्पर्धेत आपल्या विद्यालयातील इयत्ता पाचवीत शिकणारा संकेत संतोष शेरीकर हा विद्यार्थी विजेता ठरला आहे. संकेतने अहिल्याबाई होळकर यांची कथा सांगितली. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. रमाकांत स्वामी सर, पर्यवेक्षक श्री. गिरीश कुलकर्णी सरांनी त्याचे अभिनंदन केले. संस्था पदाधिकाऱ्यांनी संकेतच्या यशाबद्दल अभिनंदन केले.