21 January 2022 - विद्यालयाचा डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेचा उज्ज्वल निकाल

इयत्ता सहावी व इयत्ता नववी वर्गासाठी घेतल्या जाणाऱ्या डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेचा निकाल दिनांक 19.1.2022 रोजी लागला असून या परीक्षेत श्रीकिशन सोमाणी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. या परीक्षेला इयत्ता नववी तून एकूण 20विद्यार्थी बसले होते त्यापैकी 09विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत . तसेच इयत्ता सहावीतून 13 विद्यार्थी या परीक्षेस बसले होते त्यापैकी 06 विद्यार्थ्यांना परीक्षेत यश प्राप्त झाले आहे . इयत्ता सहावी वर्गातील चि . अथर्व मरे , चि.समर्थ गिरवलकर ,चि .रुद्रा सोमवंशी आणि कु .मधुरा जोशी या चार विद्यार्थ्यांची दुसऱ्या फेरीसाठी निवड झाली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!