23 Sep 2025 - 'कुल्फी'त्रैमासिकाने घेतलेल्या 'लिहिते व्हा!' या स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड

'कुल्फी'त्रैमासिकाने घेतलेल्या 'लिहिते व्हा!' या स्पर्धेत इयत्ता सहावी वर्गातील चि.रुद्रदीप देशमुख आणि इयत्ता आठवी वर्गातील कु.तनया मोरे या दोघांची निवड झाली आहे. विजेत्यांना बक्षीस म्हणून पुण्यात होणाऱ्या अनुभवशाळेत उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे. यात प्रसिद्ध लेखिका माधुरीताई पुरंदरे आणि वसीमबार्री मणेर मार्गदर्शन करणार आहेत. विद्यालयात मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.💐💐