28 Jan 2023 - सन २०२२ - राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत विद्यालयातील विद्यार्थी यशस्वी

दि. ११ जानेवारी २०२३ रोजी भूगोल प्रज्ञाशोध केंद्र, नवी मुंबई तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत विद्यालयातील चि.कृष्णकुमार पाटील याने १०० पैकी १०० गुण, चि. अभिजित मिरकले याने ९४ गुण व चि. क्षितीज म्हेत्रे याने ९० गुण प्राप्त करून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविले आहे. त्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन!