३ एप्रिल २०२६ - डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत Level 1 - लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन Level 2 - प्रात्यक्षिक परीक्षा दिलेल्या इयत्ता सहावीतील चि.रुद्रदीप देशमुख व कु. सोनवणे गार्गी तसेच इयत्ता नववीतील कु. आनंदी शिंदे, कु. धनश्री जगळपूरे, चि. अभिजित मिरकले, चि. अथर्व वाळके व चि. श्लोक बावळे या सातही विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापकांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. अंतिम मुलाखतीसाठी चि. रुद्रदीप देशमुख हा विद्यार्थी पात्र झाला आहे. संस्था व विद्यालयाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा दिल्या. 💐💐💐