8 February 2019 - आंतरराष्ट्रीय थाय-बॉक्सिंग स्पर्धेमध्ये विद्यालयाच्या विद्यार्थ्याचे उज्ज्वल यश


दि. १ ते ५ फेब्रुवारी २०१९ गोवा येथील मापसा येथे आंतरराष्ट्रीय थाय-बॉक्सिंग फेडरेशनतर्फे घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय थाय-बॉक्सिंग स्पर्धेमध्ये विद्यालयातील इयत्ता ९ वी वर्गातील विद्यार्थी चि. दायमी तमीम तनवीर याने तृतीय क्रमांक पटकावून ब्रॉंझपदक मिळविले आहे. या स्पर्धेमध्ये रशिया, थायलंड, दुबई, सौदीअरेबिया, अमान इत्यादी. राष्ट्र सहभागी होते. या यशाबद्दल स्पोर्ट्स प्रेसिडेंट कडून त्याचे सत्कार करण्यात आले.
दि. ४ ते ८ जानेवारी २०१९ फतेहगढ साहिब, पंजाब येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय थाय-बॉक्सिंग स्पर्धेमध्ये जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय थाय-बॉक्सिंग स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्याची निवड झाली.
त्याच्या या घवघवीत यशाबद्दल संस्था पदाधिकारी, विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. विजया कुलकर्णी, पर्यवेक्षक गिरीश कुलकर्णी, संजय क्षीरसागर, पर्यवेक्षिका सौ. सुनिता बजाज तसेच सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले व विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले!