१२ ऑगस्ट २०२६ - कुल्फी मासिक आणि कहानीघर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘झाम्या' या बालनाट्याचे विद्यार्थ्यांसाठी दोन प्रयोग विद्यालयात सादर करण्यात आले. ‘कुल्फी ‘ या मासिकात आलेल्या प्रसाद कुमठेकर या लेखकाच्या कथेचे ते नाट्यरूपांतर होते. यावेळी संस्थेचे सचिव कमलकिशोरजी अग्रवाल व शालेय समितीचे अध्यक्ष अतुल देऊळगावकर सर उपस्थित होते.