१७ जुलै २०२५ - दि. १७/०७/२०२५ रोजी विद्यालयात डॉ. आरती झंवर, डॉ. ब्रिजमोहन झंवर व संजीव भार्गव यांचे "आहार, व्यायाम व आरोग्य" याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन :- डॉ. सौ. आरती झंवर, डॉ. श्री. ब्रिजमोहन झंवर व श्री. संजीव भार्गव यांनी नुकतीच जागतिक स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठेची दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केली आहे. करिअर व फिटनेस यात एक आदर्श निर्माण केला आहे. जीवघेण्या शैक्षणिक स्पर्धेत विद्यार्थी त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहेत यासाठी वरील मान्यवरांचे “आहार, व्यायाम व आरोग्य” या विषयावर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनाचे आयोजन केले.