१८ मार्च २०२६ - विद्यालयाचा माजी विद्यार्थी लेफ्टनंट वेदांत किशोर सास्तुरकर याने आज विद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्याने स्वतःचा शैक्षणिक प्रवास सांगितला. दृढ इच्छाशक्ती असेल तर आपण कोणतेही ध्येय साध्य करू शकतो असे सांगून एका सेवानिवृत्त सैनिक अधिकाऱ्याचे भाषण ऐकून आपण सैन्य दलात जाण्याचे ध्येय निश्चित केल्याचे सांगितले. शालेय जीवनात अवांतर वाचन केल्याचा खूप फायदा झाला असेही त्याने सांगितले.