22.11.2025 विद्यालयात सुप्रसिद्ध चित्रपट संपादक(Film Editor) व सहदिग्दर्शक किरण क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना गोष्ट, कथा कशी ऐकावी? चित्रपट कसा पहावा? याबद्दल मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. याप्रसंगी प्रसिद्ध साहित्यिक व दूरदर्शन मालिकेचे लेखक प्रसाद कुमठेकर आणि शालेय समितीचे अध्यक्ष अतुल देऊळगावकर हे उपस्थित होते.