२५ फेब्रुवारी २०२६ - मराठी विज्ञान परिषदेच्या 'शनिवारी विज्ञानवारी' या उपक्रमांतर्गत इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. तमन्ना शेख व कु. अमृता माने यांनी चार सत्रात विज्ञान प्रयोगाचे विविध प्रात्यक्षिके घेतली होती. समारोपाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयोगाचे प्रात्यक्षिके सादर केली. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. रमाकांत स्वामी व परिषदेचे पानगाव विभाग प्रमुख श्री. संतोष कुलकर्णी उपस्थित होते.