२६ व २७ जुलै २०२५ - स्व. नंदकिशोर भार्गव शिक्षण अभियान अंतर्गत विद्यालयात दोन दिवसीय विज्ञान शिक्षक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी श्रीमती कुमुदिनी भार्गव यांनी आपले मनोगत व्यक्त केले व नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशनच्या तज्ञ मार्गदर्शकांचे 'लोकाभिमुख विज्ञान जाणीव जागृती' या विषयावर पालकांना मार्गदर्शन केले.