५ मार्च २०२६ - राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यालयात बालवाडी ते चौथी वर्गातील विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले. संस्थेचे सचिव मा. कमलकिशोरजी अग्रवाल यांनी प्रदर्शनाला भेट देऊन विविध प्रयोगांचे निरीक्षण केले व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या प्रदर्शनास पालकांनीही मोठ्या संख्येने भेट दिली.